यानंतर पुढची बातमी आहे लोणावळ्यातून एमबी व्हॅलीच्या 10 हजार एकर जागेपैकी 707 एकर जागेवर टाच आणण्याचा निर्णय एडी ने घेतला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहान पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या जवळ उभारलेली एमबी व्हॅली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र राहिली. मात्र सहारा समूह गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ न शकल्यान एमबी वॅलीची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे 1600 कोटी रुपये परत करण्याचा दावा करण्यात येतोय, आता देशातील कोणता उद्योगपती एमबी वॅलीचा मालक होतो याची मात्र मोठी उत्सुकता आहे. एमबी व्हॅली एकेकाळी पृथ्वीवरील मानव निर्मित स्वर्ग म्हणून याच एमबी व्हॅलीची ओळख होती. 2006 साली सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाने पुण्याच्या मुळशीत तब्बल दहा हजार एकरात उभं केलेलं हे हिल स्टेशन. सहारा समूहाचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ही एमबी व्हॅली ओळखली गेली. सहारा समूह जेव्हा रियल इस्टेट, चीट फंड, पॅराबँकिंग, हॉस्पिटलिटी, इंडियन क्रिकेट टीमची स्पॉन्सरशिप अशा... एक ना अनेक क्षेत्रांमध्ये काम करत होता, यशाच्या शिखरावरती होता, तेव्हा देखील चर्चा असायची ती या एमबी व्हॅलीची, ही एमबी व्हॅली सुंदर तर आहेच, त्याचबरोबर आत्तापर्यंत एक इकॉनॉमिक मॉडेल म्हणून ती कमालेची यशस्वी देखील ठरली आहे. लोणावळ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर 10,600 एकरात एमबी व्हॅलीची सहारा समूहाकडून उभारणी करण्यात आली. भारतातील पहिली मानव निर्मित हिल सिटी म्हणून अनेक सिनेकलाकार, क्रिकेट पटू यांच्यासह सेलिब्रिटींनी जाहिरात केल्याने एमबी व्हॅलेची मोठी चर्चा झाली. पण 2009 साली सेबीन सुब्रतो रॉय आणि त्यांच्या सहारा समूहाची चौकशी सुरू केली आणि परिस्थिती झपाट्याने बदलली. उत्तर प्रदेशात स्कूटर वरून बिस्किट आणि नमकीन विकून सुरू केलेल्या व्यवसायाची उलाढाल 30 वर्षांमध्ये हजारो कोटीन मध्ये पोहोचली होती. आपल्याकडचा पैसा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा असून पॅराबँकिंगच्या पैसा बेनामी असल्याचा आणि देश विदेशशातील उद्योगपतींचा काळा पैसा असल्याची ही चर्चा होती. यशाच्या शिखरावर असलेल्या सहारा समूहाने 2009 मध्ये शेअर बाजारात स्वतःचा आयपीओ आणला. सेबीन सहारा समूहाकडे गुंतवणूकदारांचा तपशील मागितला आणि घोटाळा उघडकीस आला. गुंतवणूकदारांनी आपल्याकडे तब्बल 24 हजार कोटी रुपये गुंतवल्याचा सहा. समूहाचा दावा होता. सेबीन या गुंतवणूकदारांची पडताळणी केली पण सहाराने दिलेली माहिती खोटी निघाली. 2014 साली सुब्रतो रॉय यांना अटक झाली. 2016 साली रॉय यांची पॅरोलवर सुटका झाली. मात्र सततच्या आजारपणामुळे 2023 साली रॉय यांच निधन झालं. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे पाच हजार कोटी रुपये परत करण्यासाठी एका पोर्टलच उद्घाटन केलं होतं. गुंतवणूकदारांनी या पोर्टलवर आपले पुरावे सादर केल्यास त्यांना पैसे परत करू असं शहांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकूण जागेपैकी 700 एकर जागा जप्त करून विकण्याच्या हालचाली ईडी ने सुरू केल्या. त्यातून 1700 कोटी रुपये उभे राहतील असं सांगण्यात आलं. 10 हजार एकरांमध्ये पसरलेल्या या एमबी व्हॅलीची मोक्याची 707 एकर जागा आधी टाच आणण्याचा आणि लिलाव करून विकण्याचा निर्णय होतो आहे. त्यातून पैसे उभार. राहणार आहेत ते 1600 कोटी रुपये आणि त्यातूनच प्रश्न निर्माण होतोय की हे सगळं गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी होतय की आणखी कोणत्या कारणासाठी? या आधी अनेक मोठे घोटाळे महाराष्ट्रात आणि देशातही उघडकीस आले. या घोटाळ्यांमध्ये हजारो गुंतवणूकदारांचा अक्षरशहा बळी गेला. वर्षानुवर्ष तपास झाल्यानंतर आणि न्यायालयात खटला चालल्यानंतरही गुंतवणूकदारांना पैसे परत मिळात. नाही, मग तो डीएस केनचा घोटाळा असो, महेश मोतेवारचा समृद्ध जीवनचा घोटाळा असो किंवा पीएनबी घोटाळा, त्यामुळे 2014 पासून न्यायालयात असलेल्या सहारा प्रकरणात. आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या देशाला घोटाळ्यांचा मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास हे सांगतो की गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाहीत. गुंतवणूकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत या नावाखाली जे काही होतं त्यातून ज्यांनी ही मालमत्ता उभारलेली असते त्याहून अधिक मोठा बाहुबली येतो आणि या मालमत्तांचा मालक बनतो. या प्रकरणात तरी वेगळं काही होईल का?